प्रगत सहविचार बैठक

प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शैक्षणिक आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ,नाशिक या विभागीय कार्यालयाचा उपसंचालक तथा प्राचार्य पदाचा कार्यभार नुकताच मा. श्री. जावळे आर एल ( ज्येष्ठ अधिव्याख्याता ) यांनी स्वीकारला आहे.
मा.डी.डी.सूर्यवंशी साहेब ( माजी उपसंचालक तथा  प्राचार्य ) यांची बदली DIECPD, संगमनेर येथे झाल्यानंतर आज दि.३/१०/२०१७ रोजी  श्री. जावळे साहेबांनी कार्यभार स्वीकारला.
१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासकीय आदेशान्वये राज्यात शिक्षण विभागाची पुनर्रचना झालेली असून पूर्वीची  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद आता  महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे  अर्थात Maharashtra Regional Academy (MAA) म्हणून ओळखली जाते.तर राज्यात  औरंगाबाद,नाशिक,नागपूर,अमरावती आणि मुंबई  या पाच ठिकाणी प्रादेशिक  विद्या प्राधिकरण (Regional Academic Authority- RAA) म्हणून विभागीय कार्यालये निर्माण झालेली आहेत.
 पूर्वी DIET ( District Institute of Education and Training )/ जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ही जिल्ह्याची शिक्षकांना प्रशिक्षण देणारी शिखर संस्था समजली जायची. आता १७ ऑक्टो २०१६ च्या विद्या प्राधिकरण पुनर्रचना आदेशान्वये DIET आता DIECPD ( District Institute of Educational Continuous Professional Development ) म्हणजेच जिल्हा शैक्षणिक आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था  म्हणून जिल्ह्याची शिखर संस्था असणार आहे.
 प्रादेशिक  विद्या प्राधिकरण (Regional Academic Authority- RAA),नाशिक  हे कार्यालय यापुढे नाशिक,नंदुरबार,धुळे आणि जळगाव  या चार जिल्ह्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत ,समन्वय आणि मार्गदर्शन करणार. असे विचार श्री .जावळे साहेबांनी व्यक्त केलेत.
श्री. जावळे साहेबांनी आज सर्वप्रथम सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत श्री.योगेश सोनवणे साहेब (ज्येष्ठ अधिव्याख्याता), श्री.खारके साहेब (ज्येष्ठ अधिव्याख्याता),श्रीम.चव्हाण (अधीक्षक), श्री.आर टी बागुल ,श्री.गोपीनाथ  भोई, श्री.संतोष गायकवाड ,श्री सतीश देशपांडे, श्री.चौधरी आणि श्री घुशिंगे  उपस्थित होते.
तर प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे श्री निलेश पाटोळे आणि सौ नेहा शिरोरे  हे विषय सहाय्यक उपस्थित होते.
 DIECPD मधील श्री अशोक चव्हाण,श्री.वाल्मिक चव्हाण ,श्री.प्रशांत शेवाळे आणि वैभव शिंदे हे विषय सहाय्यक उपस्थित होते.
बैठकीतील महत्वाची चर्चा.
  1.  सर्व अधिकारी आणि विषय सहाय्यक यांच्याशी मा. जावळे साहेबांनी प्रथम चर्चा करून सगळ्यांची मते जाणून घेतली.
  2. डॉ नेहा शिरोरे यांनी निफाड बिट प्रगत केल्याचे त्यांनी समजून घेतले आणि तसाच  एखादा Pattern राबविता येईल का यावर सगळ्यांची मते जाणून घेतली.
  3. सर्व अधिव्याख्याते आणि विषय सहाय्यक यांनी जिल्ह्यातील सोयीचे एक केंद्र निवडावे आणि त्या केंद्रातील सर्व शिक्षकांना MOT च्या Support,Councelling ,Mentoring and Facilitatating  या चार तंत्रांच्या साहाय्याने Motivate करावे.
  4. दत्तक घेतलेल्या केंद्रास सर्व शैक्षणिक आदेशाविषयी मार्गदर्शन करावे.
  5. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जी आर नुसार केंद्र प्रगत करणे.
  6. अधिकाधिक शिक्षण परिषदांमधून शिक्षकांना भाषा, गणित,विज्ञान ,इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन करणे.
  7. सर्व जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यातील केंद्र, शाळा यांची सांख्यीकी माहिती संकलित करणे.
  8. प्रगत शाळा ,तंत्रस्नेही शिक्षक, ABL schools, Digital schools, ISO schools यांची संख्या प्राप्त करणे.
  9. प्रस्तुत कार्यालयातील सर्व अधिकारी आणि विषय सहाय्यक विभागातील कोणत्याही शाळेस भेट देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र- गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करू शकतील , असे पत्र शिक्षणाधिकारी,नाशिक/नंदुरबार/जळगाव/धुळे यांना निर्गमित करणे.
  10. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यास स्वतंत्र टेबल,संगणक (इंटरनेटसह) आणि नावाची पाटी उपलब्ध करून देणे.
  11. आपली ओळख आपण स्वतःच निर्माण करायची.

वरील मुद्द्यांना अनुसरून अतिशय सुंदर आणि Productive discussion मा. जावळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मा. खारके साहेब आणि मा. सोनवणे साहेब यांनी चर्चेत महत्त्वाचा सहभाग नोंदवला.

श्री.सतीश देशपांडे (लेखापाल) यांनी एक महत्त्वाची विनंतीवजा सूचना मांडली.
 प्रशिक्षणाच्या  आर्थिक बाबी लेखापाल ,अधिक्षक यांच्या टिप्पणी मंजुरीनंतरच पुढे forward करण्यात याव्यात.

मा.जावळे साहेब यांनी  टीम RAA आणि DIECPD यांच्या माध्यमातून  केंद्र आणि नंतर विभाग प्रगत करण्याचे ध्येय ठेवले  आहे.

चला तर........

एकच ध्यास......गुणवत्ता विकास.......




Regards

Ashok Chavan
SARP( State Academic Resource Person)/Subject Expert -English
RAA/DIECPD,Nashik

Comments

Popular Posts