ETF rolled out successfully


CHESS
 (Continuous help To Teachers of English From Secondary Schools )
ETF म्हणजे English Teachers Forum ..माध्यमिक शाळेतील इंग्रजी शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा समृद्धीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.हा कार्यक्रम राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण,औरंगाबाद यांच्या माध्यमातून राबविला जातोय.ह्या कार्यक्रमाचे नाव ..CHESS असे आहे.. त्याअन्तर्गत  संपूर्ण राज्यात ४३३ ETF आहेत.ETF मधून ३६ जिल्ह्यातील  १५००० माध्यमिक इंग्रजी शिक्षकांना ३ वर्ष प्रशिक्षण मिळणार आहे.  BRC आणि URC स्तरावर प्रत्येकी १ ETF असणार आहे. ज्या तालुक्यात ५० पेक्षा जास्त शिक्षक असतील तेथे २ ETF असतील.
पहिल्या वर्षी ६ ,दुसर्या वर्षी १० आणि तिसर्या वर्षी १० ETF meetings होणार आहेत.प्रत्येक ETF ला ५० माध्यमिक शिक्षक असावेत.अशी अपेक्षा आहे. सर्व शिक्षक हे शासकीय शाळेतील असावेत.
 नाशिक जिल्ह्यात २१ ETF आहेत.नाशिक जिल्ह्यात २१ ETF पैकी २० ETF च्या २ meetings यशस्वी झाल्या आहेत.पहिल्या ETF साठी ८१२ पैकी ६६६ शिक्षक उपस्थित होते.तर दुसर्या मिटिंग साठी ८१४पैकी ७०६ शिक्षक उपस्थित होते.
मिटिंग घेणाऱ्या master trainer ला moderator म्हणतात  आणि त्याच्यासाठी  moderator pack हे resource book बनविण्यात आलेले आहे तर ETF meeting मध्ये सहभागी  शिक्षकासाठी  member pack नावाचे पुस्तक विकसित करण्यात आलेले आहे.
गटशिक्षणाधिकारी प्रत्येक मिटिंग चे  आयोजन,नियोजन करतीलमाध्यमिक शाळेतील शिक्षकांना relieve करण्याची जबाबदारी त्यांनी शिक्षण विस्ताराधिकारीवर सोपवावी. प्रत्येक मिटिंग यशस्वी होईल, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक शिक्षकास चहा आणि अल्पोपहारासाठी ५०/- खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.
 संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील २१ ETF चे  व्यवस्थापन DIECPD स्तरावर  मा. श्री. योगेश सोनवणे (ज्येष्ठ अधिव्याख्याता DIECPD ,Nashik  आणि  श्री. अशोक चव्हाण ( SARP, DIECPD ,Nashik ) बघत आहेत.
ETF  च्या यशस्वीतेसाठी मा. रविंद्र जावळे साहेब ( उपसंचालक तथा प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण/ DIECPD,नाशिक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.
मा. जावळे साहेबांनी २ ETF meeting च्या यशस्वी आयोजनानंतर खालील संदेश दिला आहे.
आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळेतील इंग्रजी शिक्षकांनी स्वतःच्या  व्यावसायिक विकासासाठी (CPD- Continuous Professional Development )आणि विद्यार्थ्यांच्या इंग्रजी कौशल्य विकसनासाठी ETF Meeting साठी सहभागी व्हावे. मुख्याध्यापकांनी सुद्धा आपल्या शिक्षकांना मिटिंग साठी उपस्थित राहण्यासाठी प्रेरीत करावे.”
चला तर .....
एकच ध्यास .....गुणवत्ता विकास ...

Regards
Ashok Chavan
( State Academic Resource Person )

9763102742




Comments

Popular Posts